शंभर कोटी अब्रुनुकसान प्रकरण : चंद्रकांत पाटील यांचा अर्ज न्यायालयाकडून नामंजूर

Updated On:
शंभर कोटी अब्रुनुकसान प्रकरण : चंद्रकांत पाटील यांचा अर्ज न्यायालयाकडून नामंजूर

कोल्हापूर(प्रतिनिधी) – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रवक्ते किरीट सोमया आणि आपल्या विरुध्द केलेला शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा रद्द करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 

पण न्यायालयाने हा दावा चालण्यास पात्र असल्याचे स्पष्ट करत पाटील यांचा अर्ज नामंजूर केला अशी माहिती मुश्रीफ यांचे वकील अॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांच्या वतीने मुंबई येथील वकील अॅड प्रल्हाद परांजपे यांनी युक्तिवाद केला. तर मुश्रीफ यांच्या वतीने अॅड  प्रशांत चिटणीस व सतीश कुणकेकर यांनी युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूचे म्हणणे विचारात घेऊन न्यायाधीश राणे यांनी मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या दाव्यात कारण आहे. यामुळे दावा चालण्यास पात्र आहे असे स्पष्ट करुन पाटील यांचा अर्ज नामंजूर केल्याचे अॅड चिटणीस यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार

2026-10-07 08:02:22

Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार

Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश

2026-10-02 05:15:41

Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश

Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड

2026-10-01 17:43:48

Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

2026-09-25 09:22:50

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

Jui Gadkari: जुई गडकरीचे लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलासोबत जोडलं नाव; डीपफेक व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली

2026-09-22 12:48:50

Jui Gadkari: जुई गडकरीचे लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलासोबत जोडलं नाव; डीपफेक व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली