Huma Qureshi : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास एका भव्य पुनरागमनाची तयारी करत आहे. त्याचे आगामी सर्वेच चित्रपट खूप चर्चेत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून “द राजा साब” चित्रपटाच्या सतत लांबणीवर पडणारी रिलीज डेट यामुळे सर्वत्र हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. अखेर आता नवीन वर्षात ९ जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रभास संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित करत असलेल्या स्पिरीट आणि फौजी या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये फर्स्ट लूक समोर आला आहे. एका न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरीटमध्ये एक खास गाणं असणार आहे. या गाण्यासाठी अभिनेत्री हुमा कुरेशीची निवड करण्यात आली आहे. ती स्पिरीटमध्ये एक खास नृत्य करताना दिसणार आहे. या वर्षी अभिनेता राजकुमार रावचा “मालिक” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिल थाम के या गाण्यावर हुमा कुरेशीने एक डान्स नंबर केला होता. या गाण्याची बरीच चर्चा झाली. प्रेक्षकांनी हुमाच्या डान्स नंबरला पसंती दिली. त्यामुळे तिला पुन्हा एकदा डान्स नंबर सादर करण्याची संधी स्पिरीट चित्रपटाने उपलब्ध करून दिली आहे. प्रभासने आता संदीप रेड्डी वांगाच्या स्पिरीट चित्रपटावर काम सुरू केले असून, चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्यासह अनेक बॅालिवूड कलाकारही असणार आहेत. प्रभाससोबत स्पिरीट बनवण्यापूर्वी संदीप रेड्डी वांगाने अॅनिमलचे दिग्दर्शन केले होते. रणबीर कपूर अभिनीत या चित्रपटाने ९१५ कोटींचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन केले होते. हेही वाचा : पवार कुटुंबात लगीनघाई! जय पवारांचं लग्न परदेशात; ४०० जणांना आमंत्रण, ‘असा’ आहे संपूर्ण कार्यक्रम वाचा….