Huma Qureshi New Year Plans: नवीन वर्ष येण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार या काळात पार्टी, प्रवास किंवा वेकेशनची तयारी करत आहेत. पण अभिनेत्री हुमा कुरैशी हिने यंदा नवं वर्ष साजरं करण्यासाठी अगदी वेगळाच प्लॅन केला आहे. एका मुलाखतीत हुमा म्हणाली की, ती नव्या वर्षात कुठेही फिरायला जाणार नाही किंवा पार्टीही करणार नाही. ती म्हणते, “माझं हे वर्ष खूपच गडबडीचं गेलं आहे. त्यामुळे नवीन वर्षात मला तीन दिवस फक्त झोपायचं आहे आणि आराम करायचा आहे. मी नवीन चित्रपटावर काम सुरू करणार आहे, म्हणून वर्षाच्या शेवटी मला स्वतःसाठी वेळ हवा आहे.” हुमा पुढे म्हणाली की, “मी फार हॉलिडे पर्सन नाही, ना रिझोल्यूशन करणारी आहे, ना पार्टी करणारी. मला फक्त ‘मी टाइम’ हवा आहे. काहीच न करता शांतपणे रिलॅक्स करायचं आहे.” ‘टॉक्सिक’ चित्रपटात झळकणार हुमा कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं, तर हुमा कुरैशी लवकरच ‘टॉक्सिक: अ फेरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या साउथ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात साउथ सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत आहे. हुमा या चित्रपटात एलिझाबेथ हे पात्र साकारणार आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिला असून, यश यांच्या प्रॉडक्शन हाऊसखाली तो तयार करण्यात आला आहे. कधी होणार ‘टॉक्सिक’ रिलीज? ‘टॉक्सिक’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाशी होणार आहे. सध्या ‘धुरंधर’ चित्रपटाने तब्बल 700 कोटी रुपयांची कमाई केली आहे.