जॅक स्नायडरच्या सिनेमामध्ये हुमा कुरेशी

अमेरिकेतील चित्रपट निर्माता जॅक स्नायडर यांनी आपल्या आगामी “आर्मी ऑफ द एंड’ सिनेमामध्ये हुमा कुरेशीला घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पहिल्या हॉलिवूडपटामध्ये काम करण्यासाठी हुमा खूपच उत्साहात आहे. केंव्हा एकदा “आर्मी ऑफ द एंड’चे शुटिंग सुरू होते आहे, असे तिला झाले आहे. ही संधी मिळाल्यापासून तिचा उत्साह दुपटीने वाढला आहे. स्नायडरची ती अगदी फॅन आहे. त्यामुळेही त्यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने ती अधिक आनंदी आहे. हॉलिवूडपटांमध्ये अलिकडच्या काळात दीपिका आणि प्रियांकाने रोल केले आहेत. त्याबरोबर आता हुमाचीही वर्णी हॉलिवूडपटांमधील लीड रोलसाठी लागली आहे.

“आर्मी ऑफ …’मध्ये तिचा रोलही मध्यवर्ती आहे. तिने आतापर्यंत अशा सिनेमामध्ये कधीच काम केलेले नव्हते. या सिनेमात हुमाच्या बरोबर एला पुर्नल, एना डे ला रेग्युएरा आणि थियो रॉसी सारखे कलाकार असणार आहेत. “आर्मी ऑफ द एंड’च्या माध्यमातून स्नायडर जॉम्बी शैलीमध्ये पुनरागमन कर्णार आहे. यापूर्वी “डॉन ऑफ द डेड’मधून स्नायडरनी डायरेक्‍शनमध्ये पाऊल ठेवले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)