Huma Qureshi: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी वुमन-सेंट्रिक भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’पासून ते ‘महारानी’पर्यंत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये हुमाने फेमिनिझमविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं. तिच्या मते, फेमिनिझमचा अर्थ आज अनेकजण चुकीच्या पद्धतीने समजून घेत आहेत. “फेमिनिस्ट असणं काही चुकीचं नाही”… हुमा कुरैशी एका पॉडकास्टमध्ये बोलताना हुमा म्हणाली, “आजच्या काळात फेमिनिझम या शब्दाभोवती खूप निगेटिव्हिटी तयार झाली आहे. हा शब्द लोक चुकीचा समजत आहेत.” “आपण पुरुष असो किंवा स्त्री, फेमिनिस्ट असणं ही चांगली गोष्ट आहे.” “फेमिनिझम म्हणजे फक्त एवढंच की, प्रत्येकाला समान संधी मिळावी, सर्वांना समान वागणूक मिळावी.” ती पुढे म्हणाली, “मुलगा आणि मुलगी दोघांनाही सारख्या संधी मिळाल्या, सारखं वातावरण मिळालं तर विचारही एकसारखा होतो.” “पुरुषांना कमी दाखवणं हा मुद्दा नाही” हुमा कुरैशीने फेमिनिझमबद्दलच्या चुकीच्या समजांना उत्तर देताना स्पष्ट सांगितलं,“कोणीही असं म्हणत नाही की पुरुषांना कमी दाखवा. हा अजिबात उद्देश नाही.” “फेमिनिझम म्हणजे समानता आणि आदर.” तिने सांगितलं की समाजात फेमिनिझमला अनावश्यक वादग्रस्त बनवलं जातं, पण प्रत्यक्षात तो न्याय आणि समतेचा विचार मांडणारा शब्द आहे. हुमा कुरैशीचा वर्कफ्रंट नुकतीच हुमा कुरैशीची लोकप्रिय मालिका ‘महारानी 4’ प्रदर्शित झाली. ती ‘दिल्ली क्राइम 3’ चा देखील भाग आहे. त्याआधी तिने ‘सिंगल सलमा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हुमा कुरैशी सातत्याने दमदार भूमिका आणि ठाम विचारांसाठी चर्चेत असते.