Huma Qureshi : अखेर लग्नाच्या चर्चांवर हुमाने मौन सोडलं; रचित सिंगची प्रतिक्रिया चर्चेत म्हणाला…
Huma Qureshi : दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.

Huma Qureshi : अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi ) आणि अभिनय प्रशिक्षक रचित सिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मनोरंजनविश्वात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. मध्यतंरी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी समोर आली होती. मात्र, ही बातमी नसून अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
दोघांनीही अनेकदा एकत्र वेगवेगळ्या कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावही आहे. दोघांचे एकत्रित अनेक फोटोही आहेत. त्यामुळे दोघांच्या नात्याच्या चर्चा सातत्याने रंगत असतात. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी हे दोघे यावर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, यावर आता दोघांनीही मौन सोडलं असून प्रतिक्रिया दिली आहे.
लग्नाबाबत हुमाचे उत्तर (Huma Qureshi)
एचटी सिटीला दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी विचारलं असता हुमा म्हणाली, “हा प्रश्न तुम्ही आणि माझी आई दोघेही सारखाच विचारता. लग्न कधी होणार याचं उत्तर सध्या माझ्याकडे नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते होईल. सध्या माझ्याकडे खूप काम आहे. हे वर्ष अत्यंत व्यस्त असून माझे पूर्ण लक्ष कामावर आहे.”
रचितनेही अफवांवर व्यक्त केले मत
काही दिवसांपूर्वी रचित सिंगनेही लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला, “माझं लग्न कोण आणि कुठे ठरवत आहे, हेच मला माहीत नाही. आता तर मला माझ्या आईचा नंबरच द्यावा लागेल असं वाटतं, कारण सगळेजण तिलाही याबद्दल विचारत आहेत. सध्या तरी मी लग्न करत नाही.”
‘बेबी डू डाय डू’मध्ये एकत्र झळकले
हुमा आणि रचित यांनी ‘बेबी डू डाय डू’ या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने आतापर्यंत सुमारे ७.१० कोटी रुपये इतकीच कमाई केली आहे.
हुमाचे आगामी प्रोजेक्ट्स
कामाच्या आघाडीवर बोलायचं झाल्यास हुमा कुरेशी लवकरच ‘टॉक्सिक’ या बहुचर्चित चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. या चित्रपटात यश, कियारा अडवाणी आणि तारा सुतारिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट त्यातील काही बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांमुळे आधीच चर्चेत आला आहे.






