पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, यादवनगर, कुदळवाडी येथे दिनेश यादव यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. “एक थेंब रक्ताचा, वाचवेल जीव मोलाचा!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या शिबिरात कुदळवाडी परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शिबिराचे प्रमुख आयोजन आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर अँड. योगेश सोनवणे व दिनेश लालचंद यादव यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट / ब्लूटूथ / टिफिन बॉक्स यापैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या शिबिरास आमदार महेशदादा लांडगे नगरसेवक कुदंन गायकवाड, निलेश नेवाळे, कपिल म्हेत्रे, विजयराज यादव, दिलीप यादव, साहेबराव यादव, लालचंद यादव उपस्थित होते.