न्यूयॉर्कमध्ये भीषण स्फोट; पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी घडली मोठी दुर्घटना; परिसरात भीतीचे वातावरण
USA Bomb Blast | अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर स्फोटाने हादरले आहे. मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साइडमध्ये शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला. भीषण स्फोटानंतर मॅनहॅटनमध्ये धुराचे लोट दिसून आले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीआधीच हा स्फोट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजता ईस्ट 95 स्ट्रीट आणि 2 ॲव्हेन्यूजवळ हा स्फोट झाला. ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. USA Bomb Blast |
🚨 #BREAKING: Explosion rocks NEW YORK CITY
Massive explosion has ROCKED the Upper East Side with over 100 firefighters and first responders on scene. Cause still unknown pic.twitter.com/bMOJDchtpj
— The Patriot Oasis™ (@ThePatriotOasis) August 15, 2025
नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
व्हायरल व्हिडिओमध्ये या स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी 100 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान आणि बचावकर्ते तातडीने दाखल झाले आहेत. USA Bomb Blast |
दरम्यान, दुर्घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला? ही दुर्घटना आहे की दहशतवादी हल्ला? याचा तपास सध्या केला जात आहे. USA Bomb Blast |
हेही वाचा :





