बंपर ऑफर! अवघ्या 25 हजारात मिळतोय iPhone 15, निम्म्या किंमतीत घेऊन जा घरी

iPhone 15 Offer | भारतात आयफोनचे प्रचंड वेड आहे. नवीन आयफोन लाँच झाला की खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. मात्र, असेही काहीजण आहेत की जे फोनच्या जास्त किंमतीमुळे खरेदी करणे टाळतात. मात्र, आता iPhone 15 ला चक्क 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून iPhone 15 ला तुम्ही 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या फोनवर बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. आयफोन 15 वरील ऑफर आणि फीचर्सविषयी जाणून घेऊयात.
iPhone 15 वर मिळेल बंपर ऑफरचा फायदा
iPhone 15 चे 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 69,999 रुपये आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 7 टक्के डिस्काउंटनंतर 64,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्सही उपलब्ध आहे. यूपीआयने पेमेंट केल्यास 2,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक मिळेल.
iPhone 15 वर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 39,150 रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून आहे. तुम्हाला या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास iPhone 15 ला फक्त 25,849 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.
iPhone 15 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 15 मध्ये कंपनीने शानदार अॅल्युमिनियम डिझाइन दिले असून, यामध्ये ग्लास बॅक मिळतो. या फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP68 रेटिंग मिळाले.
अॅपलने यात 6.1 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये HDR10+ चा सपोर्ट मिळतो. डिस्प्लेमध्ये सुरक्षेसाठी Ceramic Shield ग्लास दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Apple A16 Bionic चिपसेट आहे.
तसेच, iPhone 15 मध्ये 6GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी 48+12 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 15W फास्ट चार्जिंगसह 3349mAh बॅटरी मिळते.





