HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्याने घट झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी शिक्षण आयुक्त संचिंद्र प्रताप सिंह, सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते. मुलींचा निकाल – ९३.१५ टक्के मुलांचा निकाल – ८६.८० टक्के मुलींचा निकाल मुलांपेक्षा ६.३५ टक्केने अधिक कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९४.१४ टक्के सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८४.१४ निकाल टक्के विभागनिहाय निकाल (HSC Result ) HSC Result : बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुली ठरल्या अव्वल; राज्याचा ८९.७९ टक्के निका पुणे – ९१.२५ नागपुर – ८८.६७ छत्रपती संभाजीनगर – ८८.६८ मुंबई – ९०.०८ कोल्हापूर – ८९.९७ अमरावती – ९०.९२ नाशिक – ९०.७२ लातूर – ८४.१४ कोकण -९४.१४ हेही वाचा: Pratibha Chakankar : EDचा ससेमिरा! चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीकडून समन्स; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू