Mugdha Shah : अभिनेत्री हृता दुर्गुळेने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. मात्र हृताच्या खऱ्या आयुष्यातील सासू आता पुन्हा एकदा मालिकेत पाहायला मिळणार आहे. हृताच्या पहिल्या ‘दूर्वा ‘ मालिकेत त्यांनी ऑनस्क्रीन सासुबाईंची भूमिका साकारली होती. तब्बल 13 वर्षांनी मुग्धा शहा मालिका विश्वात परतणार आहेत. स्टार प्रवाहवरील आनंदी मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. अभिनेत्री मुग्धा शहा मालिकेत शिल्पा निंबाळकर हे पात्र साकारत आहेत. दुर्वा मालिकेनंतर त्या स्टार प्रवाहसोबत काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली आनंदी मालिका सध्या प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या मालिकेत शिल्पा निंबाळकर या पात्रामुळे वादळ येणार आहे. Mugdha Shah 13 वर्षांनी साकारणार खलनायिका (Mugdha Shah) या पात्राविषयी सांगताना मुग्धा शाह म्हणाल्या ‘ मी 35 वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे. या काळात जवळपास 80% भूमिका मी खलनायिकेच्या साकारल्या आहेत. या मालिकेत शिल्पा निंबाळकर या पात्राचा दरारा आहे. शिल्पा ही युगंधरची मोठी बहीण. तिने प्रेमासाठी एका गरीब मुलाशी लग्न केलं.पण लग्नानंतर मूल होत नसल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. त्या वेदनादायक अनुभवामुळे तिच्या मनात गरीब लोकांविषयी प्रचंड द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला. तिचा असा विश्वास आहे की गरीब लोक अनेकदा पैशांसाठी इतरांचा फायदा घेतात आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवता येत नाही.असा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला तिचं युगंधरवरही प्रेम आहे. भावासाठी ती जीवही देऊ शकते. जेव्हा शिल्पाला युगंधर आणि आनंदी च्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा एक नको नाट्य रंगणार आहे, ” असं त्या म्हणाल्या. Mugdha Shah दरम्यान, हृताने हिंदी सिनेमॅटोग्राफर आणि लेखक -अभिनेता प्रतीक शाह याच्याशी लग्न केलं. अनेक सुपरहिट हिंदी मालिकांचे दिग्दर्शन त्याने केलं आहे. हेही वाचा: AC Temperature: एसीचं तापमान खूप कमी ठेवताय? सावधान! आरोग्यासाठी किती डिग्री योग्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला