ह्रितिक रोशनची एक्‍स वाईफ सुजैन खान पुन्हा चर्चेत

बॉलीवूड अभिनेता ह्रितिक रोशनची एक्‍स वाईफ आणि प्रसिद्ध इंटिरिअर फॅशन डिझायनर सुजैन खान आपल्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. टीव्हीवर असो, या आपल्या पर्सनल कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी तिच्या लुक हा पाहण्यासारखाच असतो. आता सुजैन हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खूपच हॉट फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे.

सुजैन खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2018मधील समर हॉलिडेच्या वेळचा आहे. #flashbacksummerof18 असे लिहित तिने फोटोबाबत माहिती दिली. या फोटोमध्ये सुजैन पिंक आणि डार्क ऑलिव ग्रीन कलरच्या बिकीनीमध्ये दिसते. तिने काळा गॉगल आणि कॅप घातली असून बीचवर ती सनबाथचा आनंद घेताना दिसते.

या फोटोला कॅप्शन देत तिने पुन्हा एकदा हॉलिडेवर जाण्याची इच्छा जाहीर केली आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून अनेकांनी सुजैनला कॉम्प्लिमेंर्टस देत कॉमेंट्‌स केल्या आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)