मुंबई – अभिनेता ‘हृतिक रोशन’ आपल्या रोलसाठी तर प्रसिद्ध आहेच, त्याशिवाय तो आपल्या सिनेमात केलेल्या स्टंटसाठीही प्रसिद्ध आहे. हृतिक रोशनने त्याच्या सिनेमांमध्ये केलेले स्टंट
प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. त्याची बॉडी आणि स्ट्रेंग्थ तर जबरदस्त आहेच. त्याशिवाय त्याने स्वतःला कायमच ऍक्शन हिरोसाठी फिट ठेवले आहे.
आता त्याने आपल्या या इमेजला साजेसा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावरच्या एका स्लाईडवरून
View this post on Instagram
जमिनीपर्यंत मोटरसायकल चालवताना दिसतो आहे. त्याचा हा स्टंट बघताना अंगावर शहारे येतात. हृतिकचा हा व्हिडिओ एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी केला गेलेला आहे.
मात्र, हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर हृतिक आणि ही जाहिरात ज्या कंपनीसाठी केली गेली आहे, त्या कंपनीलाही ट्रोल केले जाऊ लागले आहे. ट्रोल करणाऱ्यांनी या स्टंटच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली.
बुर्ज खलिफावर असा रॅम्प कोणी बनवला असा प्रश्नही एकाने विचारला आहे. तर दुसऱ्याने स्टंट करताना सांगितले की “मी देखील असेच काही ट्रोल केले होते. आता देवाघरी बसलो आहे.’