हृतिक रोशनच्या नवीन सिनेमाची इतक्यात काहीच चर्चा नव्हती. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये त्याच्या आगामी सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आता हृतिकचा एक हटके अंदाजातील लुक रिलीज झाल्यामुळे त्याच्या या नव्या लुकचा रोल असलेल्या सिनेमाची चर्चाही व्हायला लागली आहे.
या लुकमध्ये हृतिक चक्क दाढी वाढवलेला दिसतो आहे. यापूर्वी “सुपर 30′ मध्येही त्याने दाढी वाढवली होती. पण ती खुरटी दाढी होती. नवीन लुकमध्ये तो चक्क कॉर्पोरेट स्टाईल दाढीमध्ये दिसतो आहे. त्यावरून त्याच्या नवीन रोलबाबतचा अंदाज केला जातो आहे.
हृतिक “क्रिश’च्या पुढील भागाची तयारी करत असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पण हृतिकने अशी कोणतीच घोषणा केलेली नाही. त्याला हॉलिवूडमधील एका ऍक्शनपटात लीड रोलची ऑफर देखील मिळाली आहे.
View this post on Instagram
याबरोबरच तो आणखी एका ऍक्शनपटात गुप्तहेराच्या रोलमध्येही दिसणार आहे, असेही समजले आहे. कदाचित या दोन्हीपैकी एखाद्या सिनेमाची तयारी म्हणून त्याने दाढी वाढवली असावी.
View this post on Instagram
. Ye selfie hai . कैमरे का बटन मेरे हाथ में है । वाह! आइ एम प्राउड ओफ़ मायसेल्फ़ ।
“वॉर’ आणि “बॅंग बॅंग’मध्येही हृतिकने गुप्तहेराचा रोल केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या फॅन्सना खूप आवडले होते. आता हा नवीन लुक असलेला सिनेमाही त्याच्या फॅनक्लबला खूप आवडेल.