“मी भारताचा खूप मोठा चाहता” ; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हार्वर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज

Howard Lutnick on India । वॉशिंग्टन डीसी याठिकाणी झालेल्या अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचात अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करण्याबद्दल महत्वपूर्ण भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचा आणि जनादेशाचा उल्लेख करताना त्यांनी, ‘ट्रम्प हे अमेरिकेचे एकमेव नेते आहेत ज्यांना संपूर्ण देशाने निवडून दिले आहे. तर भारतातही पंतप्रधान मोदींची परिस्थिती अशीच आहे. जगात असे फार कमी नेते आहेत ज्यांना संपूर्ण देशाचा जनादेश मिळाला आहे. हेच दोघांमधील संबंध विशेष आणि दुर्मिळ बनवते.’ असे म्हणत दोन्ही देशाविषयी भाष्य केले आहे.
लुटनिक यांनी दोन्ही देशांच्या मजबूत नात्याचे वर्णन व्यापार कराराच्या दृष्टीने सकारात्मक सुरुवात म्हणून केले. लुटनिक यांनी या कार्यक्रमात, ‘जेव्हा संबंध मजबूत असतात तेव्हा व्यापार कराराचा मार्ग सोपा होतो.’ असे म्हणत दोन्ही देशातील व्यापार वाढीवर भाष्य केले.
“पहिले पाऊल उचलणाऱ्या देशांना चांगला करार” Howard Lutnick on India ।
हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, व्यापार करारांना सहसा काही वर्षे लागतात, परंतु भारत ही प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले, ‘पहिले पाऊल उचलणाऱ्या देशांना नेहमीच चांगला करार मिळतो.’ भारत या दिशेने सक्रिय आहे आणि आम्हाला आशा आहे की लवकरच एक करार होईल जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल.’ असे म्हणत टॅरिफ विषयी सकारात्मक संकेत त्यांनी दिले.
‘मी भारताचा मोठा चाहता’
लुटनिकने भारताबद्दलचे त्यांचे वैयक्तिक प्रेमही सांगितले. ते म्हणाले, ‘मी भारताचा मोठा चाहता आहे. माझे एक चांगले मित्र निकेश अरोरा आहेत, जे भारतीय आहेत. जेव्हा मी भारतात जायचो, तेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो, घरी पार्ट्या करायचो, तो एक वेगळा अनुभव होता.’असे म्हणत भारतासोबत आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे म्हटले.
‘मैत्रीपूर्ण देशांना सर्वोत्तम चिप्स द्यायचे आहेत’ Howard Lutnick on India ।
एआय आणि तांत्रिक सहकार्याबद्दल बोलताना लुटनिक म्हणाले की,”ट्रम्प प्रशासन त्यांच्या मित्र राष्ट्रांना सोबत घेण्याचा विचार करते. आम्हाला आमच्या मित्र राष्ट्रांना आमच्या सर्वोत्तम चिप्स द्यायच्या आहेत, जर ते चुकीच्या हातात जाऊ नयेत. जर भारताला मोठे डेटा सेंटर बांधायचे असतील आणि एआय क्रांतीमध्ये भागीदार व्हायचे असेल तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हॉवर्ड लुटनिक म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे विचार ‘अमेरिका प्रथम’ आहेत, परंतु ‘फक्त अमेरिका’ नाहीत. प्रथम आपल्याला आपला देश मजबूत करायचा आहे, नंतर आपल्याला आपल्या मित्र राष्ट्रांची काळजी घ्यावी लागेल. त्याला भारताबद्दल खूप आदर आहे. आपण भारतासोबत एका उत्तम भागीदारीकडे वाटचाल करत आहोत.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.





