Raj Thackeray And Uddhav Thackeray | मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतची चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, दोघे ठाकरे बंधु एकत्र कधी येणार ही प्रतिक्षा अनेकजण करत आहे. मात्र या चर्चांबाबत मनसेची नेमकी भूमिका काय आहे? हे मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. “शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भातील निर्णय राज ठाकरे घेत असतात. यासंदर्भात कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचे तोंड दुधाने पोळले गेले आहे. त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही, तोवर आम्ही निर्णय घेणार नाही. ज्यावेळेला येईल, त्यावेळी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील,” असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. “कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही” “२०१४ आणि २०१७ मधील घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. ज्यावेळी आपण युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा म्हणजेच २०१४ रोजी बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. पण सुभाष देसाईंना ते भेटले, तेव्हा राज ठाकरेंना युती करायची आहे, असं त्यांना कळवलं होतं. याला प्रस्ताव म्हणतात, पण असा कोणताही प्रस्ताव आता आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्यावर राज ठाकरेंनी कसा निर्णय घ्यायचा आहे?” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला. Raj Thackeray And Uddhav Thackeray | “दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, सगळी शिवसेना म्हणत असेल की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जायला हवे, तर उद्धव ठाकरेंकडून एक कॉल यावा अशी अपेक्षा आहे. कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावे. एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील. जोपर्यंत त्यांच्याकडून काहीही ठोस येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढे कसे जाणार?”, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. Raj Thackeray And Uddhav Thackeray | हेही वाचा: लष्कर-ए-तोयबाच्या प्रमुखाला भारताकडे करणार सुपूर्द? ; हाफिज सईदच्या मुलाचा व्हिडिओ समोर