How To Clean Gold: सोन्याचे दागिने महागडे असतात आणि त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते. कानातले, अंगठ्या किंवा मंगळसूत्रावर मळ, तेल किंवा धूळ साचू लागली की दागिन्यांची चमक कमी होते. अशावेळी घरच्या घरीच ते नीट आणि सुरक्षित पद्धतीने साफ करता येतात. पाहूया काही सोपे उपाय. १. टूथपेस्टने स्वच्छता अत्यंत मऊ आणि बिनदाणेदार टूथपेस्ट वापरा. दागिन्यावर हलक्या हाताने टूथपेस्ट चोळा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. दागिने जोरात घासू नये. या प्रक्रियेने सोनेाची चमक परत येते. २. घरातील भांडे धुण्याच्या लिक्विडचा वापर एक कप कोमट पाण्यात एक चमचा भांडे धुण्याचे लिक्विड मिसळा. यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. दागिने १५ मिनिटे यात भिजत ठेवा. नंतर हलक्या ब्रशने स्वच्छ करून पाण्याने धुवा. यामुळे दागिन्यांवरील जमलेली घाण सहज निघते. ३. हळदीच्या पाण्याने स्वच्छता एका पॅनमध्ये पाणी गरम करा. त्यात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा कपडे धुण्याचा डिटर्जंट घाला. पाणी उकळल्यावर गॅस बंद करून हे पाणी कोमट होऊ द्या. यात दागिने १५–२० मिनिटे भिजत ठेवा. नंतर मऊ ब्रशने स्वच्छ करून पाण्याने धुवा. यामुळे दागिन्यांवरील मळ पूर्णपणे निघतो आणि चमक वाढते. या गोष्टी कधीही करू नका ब्लीच किंवा क्लोरीनचा वापर टाळा. यामुळे दागिने कायमचे खराब होऊ शकतात. हार्ड टूथपेस्ट किंवा बेकिंग सोडा थेट दागिन्यावर लावू नका. पेपर टॉवेलने दागिने घासू नका यामुळे स्क्रॅच पडू शकतात. अॅसिड, लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर टाळा. दागिन्यांवर मोती, रत्न किंवा गोंद असेल तर गरम पाण्यात भिजवू नका यामुळे गोंद सुटू शकतो. हिरे-पन्ना असलेल्या दागिन्यांसाठी फक्त साधा साबण आणि पाण्यानेच स्वच्छता करा. योग्य पद्धतीने स्वच्छता केल्यास सोन्याचे दागिने दीर्घकाळ चमकदार राहतात आणि त्यांची गुणवत्ता अबाधित राहते.