मुंबई : महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी “माझी लाडकी बहिण योजना” सुरू केली होती. या योजनेद्वारे दरमहा महिलांच्या खात्यामध्ये 1500 पाठवले जात होते. आता निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यावर सरकारकडून 2100 रुपये पाठवण्यात येणार आहे. ही योजना विशेषतः विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या पैशांमुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्या आपल्या गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतील. हा योजना सुरु करण्यामागचा उद्देश होता. ही योजना फक्त महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, तर तुम्हाला ही आर्थिक मदत दरमहा मिळेल. चला तर मग या यादीमध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे जाणून घेवुयात… ‘या’ पद्धतीने करा चेक 1) लाडकी बहीण योजनेची लिस्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला testmmmlby.mahaitgov.in या वेबसाइटवर जावे लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला “लाभार्थी स्थिती” (Beneficiary Status) चा ऑप्शन निवडावा लागेल. 2) यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल, नंतर कॅप्चा पूर्ण करा आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. वेबसाइटवर ते टाका आणि Check ऑप्शनवर क्लिक करा. 3) यानंतर आणखी एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही तुमच्या लाडकी बहिण योजनेची स्थिती तपासू शकता. तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला योजनांची यादी पाहण्याचा ऑप्शन देखील मिळेल. 4) योजनांची लिस्ट पाहण्यासाठी, तुम्हाला तुमच्या शहरातील महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन “माझी लाडकी बहिण योजना यादी” बटणावर क्लिक करा. 5) यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचा प्रभाग निवडावा लागेल. त्यानंतर “डाउनलोड” बटणावर क्लिक करा. डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचे नाव PDF मध्ये सहज तपासू शकता. या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे नाव आहे का? हे घरबसल्या जाणून घेऊ शकता.