SBI ATM मधून दररोज किती पैसे काढता येतात? कार्डनुसार मर्यादा आणि शुल्क जाणून घ्या!

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), देशातील सर्वात मोठी बँक, आपल्या ग्राहकांना डेबिट कार्डाद्वारे ATM मधून पैसे काढण्याची सोय देते. बँकेत न जाता तुम्ही ATM मधून रोख रक्कम काढू शकता. SBI कडे 7 प्रकारची डेबिट कार्ड्स आहेत आणि प्रत्येकाची रोजची पैसे काढण्याची मर्यादा वेगळी आहे – 20,000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत.
मोफत व्यवहार आणि शुल्क –
SBI च्या नियमांनुसार, तुम्ही महिन्यात 5 वेळा SBI च्या ATM मधून मोफत पैसे काढू शकता (पैसे काढणे किंवा इतर व्यवहार). यानंतर प्रत्येक व्यवहाराला 20 रुपये + GST शुल्क लागतं. पण आता हे शुल्क वाढणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितलं की, 1 मे 2025 पासून मोफत मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहाराला जास्तीत जास्त 23 रुपये शुल्क आकारलं जाईल.
मोफत व्यवहाराची मर्यादा –
SBI च्या ATM मधून: महिन्यात 5 मोफत व्यवहार (पैसे काढणे आणि इतरही).
दुसऱ्या बँकेच्या ATM मधून: मेट्रो शहरांत 3, इतर ठिकाणी 5 मोफत व्यवहार.
त्यानंतर प्रत्येक व्यवहाराला 23 रुपये शुल्क (1 मे 2025 पासून).
कार्डनुसार रोजची मर्यादा
SBI क्लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्ड: 40,000 रुपये
SBI प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड: 1,00,000 रुपये
SBI ग्लोबल इंटरनॅशनल डेबिट कार्ड: 40,000 रुपये
SBI गोल्ड इंटरनॅशनल डेबिट कार्ड: 50,000 रुपये
SBI InTouch Tap & Go डेबिट कार्ड: 40,000 रुपये
SBI माय कार्ड इंटरनॅशनल डेबिट कार्ड: 40,000 रुपये
SBI मुंबई मेट्रो कॉम्बो कार्ड: 40,000 रुपये
SBI Rupay कार्ड: किमान 100 रुपये, कमाल 40,000 रुपये
OTP ची गरज कधी?
SBI ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी OTP आधारित व्यवस्था आणली आहे. तुम्ही 10,000 रुपयांपर्यंत पैसे काढले तर OTP लागत नाही. पण त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP येतो. हा OTP तुमच्या कार्डच्या कमाल मर्यादेपर्यंत वैध असतो. यामुळे ATM फसवणूक टाळण्यात मदत होते.
व्हिसा कार्डची मर्यादा –
SBI च्या व्हिसा डेबिट कार्डाने रोज 40,000 रुपये काढता येतात, तर आंतरराष्ट्रीय व्हिसा कार्डाने ही मर्यादा 1 लाख रुपये आहे. मर्यादा बदलायची असेल तर SBI YONO अॅप किंवा बँकेत अर्ज करून ते शक्य आहे. ही सुविधा तुमच्या सोयी आणि सुरक्षेसाठी आहे.





