पंतप्रधान मोदी, ‘मेहुलभाई…मेहुलभाई’ बोलत होते मग तो देशातून पळाला कसा? – नवाब मलिक

Updated On:
पंतप्रधान मोदी, ‘मेहुलभाई…मेहुलभाई’ बोलत होते मग तो देशातून पळाला कसा? – नवाब मलिक

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई…मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुल चोक्सी पळून जाताना त्याला पकडण्यासाठी का दाखवण्यात आली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

मेहुल चोक्सी यांना आणण्याबाबत कोणाचेही दुमत नाही, परंतु दोन-तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय. मुळात तो पळाला कसा हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

तो देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना पंतप्रधान मोदींनी का तत्परता दाखवली नाही, असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे नवाब मलिक म्हणाले. तसेच नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना कधी आणणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आणखी संबंधित बातम्या

VB-G RAM G मध्ये कामांचा आवाका वाढला; 375 प्रकारच्या कामांना मंजुरी

2026-10-06 15:45:17

VB-G RAM G मध्ये कामांचा आवाका वाढला; 375 प्रकारच्या कामांना मंजुरी

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Central Government : मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांठी 'ही' महत्वाची घोषणा

2026-09-30 19:15:16

Central Government : मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांठी 'ही' महत्वाची घोषणा

three-language policy : सहावीच्‍या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा धोरणातून सूट द्यावी! सर्वोच्‍च न्‍यायालयाचे केंद्र सरकार आणि सीबीएसईला निर्देश

2026-09-28 19:28:46

three-language policy : सहावीच्‍या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा धोरणातून सूट द्यावी! सर्वोच्‍च न्‍यायालयाचे केंद्र सरकार आणि सीबीएसईला निर्देश

Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 3 ऑक्टोबर रोजी विशेष पथके दाखल होणार

2026-09-28 15:52:11

Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 3 ऑक्टोबर रोजी विशेष पथके दाखल होणार