भारतीय चलनात 500 रुपयांच्या किती नोटा आहेत? जाणून घ्या…
Updated On:

500 rupees notes – मार्च 2024 अखेर एकूण चलनात 500 रुपयांच्या नोटाचे प्रमाण 86.5% इतके आहे. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण चलनात 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 77.1% इतके होते.
दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटाचा वापर वेगाने कमी होत असल्यामुळे 500 रुपयांच्या नोटाचा वापर वाढला असल्याचे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या वार्षिक अहवालातील माहितीत म्हटले आहे.
गेल्या वर्षी एकूण चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण 10.8% इतके होते. ते आता कमी होऊन केवळ 0.2% इतके झाले आहे. सध्या चलनात पाचशे रुपयांच्या 5.16 लाख नोटा आहे. तर दहा रुपयाच्या 2.49 लाख नोटा आहेत. नोट बंदीनंतर दोन हजार रुपयाच्या नोटा 2016 मध्ये जारी करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्यांचे वापरात प्रमाण नगन्य आहे.





