DCM Sunetra Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर (28 जानेवारी) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली आणि सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. साधारणपणे उपमुख्यमंत्री होण्यासाठी सदर व्यक्ती आमदार म्हणून निवडणूक आलेली असणे आवश्यक आहे. मात्र सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत. मग त्या उपमुख्यमंत्री कशा बनल्या असा प्रश्न साहजिकच काहींच्या मनात निर्माण होतो. मात्र घटनेत याबाबत काही नियम आहेत. ज्याद्वारे आमदार नसतानाही मंत्रीपद मिळवता येते. त्याबाबत काही नियम आहेत. उपमुख्यमंत्री निवडीचा कायदेशीर नियम – भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६४ (४) [Article 164(4)] नुसार, एखादी व्यक्ती जी विधानसभा किंवा विधानपरिषदेची सदस्य नाही, तिला मुख्यमंत्री किंवा मंत्री (ज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाचाही समावेश होतो) म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी काही अटी लागू होतात. ६ महिन्यांची मुदत: संबंधित व्यक्तीला पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधानसभेवर किंवा विधानपरिषदेवर निवडून येणे बंधनकारक असते. निवडणूक न जिंकल्यास: जर ती व्यक्ती ६ महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहाची सदस्य झाली नाही, तर तिला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजेच सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार असल्या तरी नियमानुसार, त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारता येते, परंतु ६ महिन्यांच्या आत त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे आमदार म्हणून सदस्य व्हावे लागेल. DCM Sunetra Pawar : “मी सुनेत्रा अजित पवार..”; अखेर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ