Ambadas Danve on Nitesh Rane | भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धाराशिवमधील एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी केलेल्या विधानाचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले आहेत. नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे म्हंटले. यावरून नितेश यांचे बंधु निलेश राणे यांनी देखील त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत नितेश राणेंना टोला लगावला आहे. Ambadas Danve on Nitesh Rane | शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, ‘नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मलाही कळालं नाही.’ दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. महायुतीने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नसल्याने ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाने हा मोर्चा काढला आहे. Ambadas Danve on Nitesh Rane | याबाबत अंबादास दानवे यांनी सांगितलं की, महायुतीने केलेल्या घोषणा या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसह अनेक आश्वासने दिली होती. पण यातील कोणतेही आश्वसान पूर्ण न झाल्याने आमचे आंदोलन चालूच राहणार आहे. नितेश राणे काय म्हणाले होते? धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. हेही वाचा : शिरूर तहसिल कार्यालयात महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३६३ पैकी ३०० नागरिक सहभागी, ४६ प्रकरणांची तडजोड!