“…तरीही ईव्हीएम मशीन ९९% चार्ज कसे होऊ शकते?”; पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करचा सवाल

Swara Bhaskar | अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात दिग्गज नेते मंडळींचा पराभव झाला आहे. स्वराचे पती फहाद अहमद अणूशक्ती नगरमधून शरद पवार यांच्या एनसीपीकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
फहाद अहमद यांच्या विरुद्ध अजित पवार गटाच्या आणि नवाब मलिक यांची लेक सना मलिक या लढत होत्या. यंदाच्या निवडणूकीत सना मलिक यांनी बाजी मारली मात्र या निवडणुकीत फहाद अहमद यांचा मोठा पराभव झाला आहे. यावरुन तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत.
स्वरा भास्करने शनिवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन ९९% चार्ज कसे होऊ शकते? निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. अणुशक्ती नगर विधानसभेत ९९% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?” असा सवाल तिने सोशल मिडियाद्वारे केला आहे. Swara Bhaskar |
पूरा दिन वोट होने के बावजूद EVM मशीन 99% कैसे चार्ज हो सकती है ? इलेक्शन कमीशन जवाब दे.. @ECISVEEP @SpokespersonECI
अणुशक्ति नगर विधानसभा में जैसे ही 99% चार्ज मशीने खुली उसके बीजेपी समर्थित एनसीपी को वोट मिलने लगे आख़िर कैसे ? @NCPspeaks— Swara Bhasker (@ReallySwara) November 23, 2024
दरम्यान, स्वरा भास्करचा पती फहाद अहमद महाराष्ट्राच्या ‘अनुशक्ती नगर’ मतदारसंघातून पराभूत झाला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांनी त्यांचा पराभव केला आहे. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी शिवसेनेचे तुकाराम रामकृष्ण यांचा 12,751 मतांनी पराभव केला. त्यावेळी तुकाराम 52, 466 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. Swara Bhaskar |
स्वरा भास्करच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर तिने वीरे दि वेडिंग, सरभरी, रांझना, तनु वेड्स मनु, प्रेम रतन धन पायो यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी अचानक फहाद खानसोबत लग्न केले ज्यानंतर तिच्यावर टीकाही करण्यात आली होती.





