हौथींकडून लाल समुद्रात जहाजांवरचे हल्ले सुरूच

दुबई – येमेनमधील हौथी बंडखोरांनी काल लाल समुद्रात लायबेरियाचा ध्वज असलेल्या रसायनांच्या टँकरवर हल्ला केला.
ऑलिम्पिक स्पिरीट या टँकरवर रॉकेट हल्ला झाल्यावर हे जहाज पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीजवळ आले. या रॉकेट हल्ल्यामुळे जहाजावर आग लागली नाही आणि कोणीही जखमी देखील झाले नाही, असे ब्रिटीश मिलिटरीच्या युनायटेड किंगडम मरीन ट्रेड ऑर्गनायजेशन सेंटरने म्हटले आहे.
थोड्या वेळाने या जहाजाच्या दिशेने डागण्यात आलेली आणखी ३ रॉकेट समुद्रामध्ये पडली. ही रॉकेट हौथींचे नियंत्रण असलेल्या हेदेल्दा बंदरातून डागण्यात आली होती.
जहाजांनी लाल समुद्रातून माल वाहतूक करू नये, अशी धमकी देखील हौथींनी दिली आहे. या सागरी मार्गाने दरवर्षाला १० लाख कोटी डॉलरच्या किंमतीची मालवाहतूक होत असते. मात्र इस्रायल आणि हमासच्या संघर्षामुळे हौथींच्या धमक्यांमुळे ही मालवाहतूक विस्कळीत झाली आहे.





