प्रख्यात धावपटू हरीचंद कालवश
Updated On:

नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावत विक्रमी कामगिरी केलेले ज्येष्ठ धावपटू हरी चंद यांचे जालंधरमधे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.
हरिचंद यांनी 1976 आणि 1980 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. 1978 सालच्या बॅंकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 5 हजार व 10 हजार मीटर शर्यतीमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
1976 साली मॉन्ट्रियल ऑलिम्पिक आणि 1980 सालचे मॉस्को ऑलिम्पिकमध्ये ते सहभागी जाले होते. त्यांनी 1975 सालच्या सेउल आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले होते. होशियारपूरच्या एका छोट्या खेड्यात जन्मलेले हरिचंद सीआरपीएफमधून निवृत्त झाले होते. त्यांचा भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देत उचित गौरवही केला होता.





