वीजवापरासाठी फलोत्पादनाचा ‘कृषि-इतर‘ वर्गवारीत समावेश – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
Updated On:

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या जून 2015 च्या आदेशानुसार वीजपुरवठ्यासाठी कृषि ग्राहकांची विभागणी कृषि व कृषि इतर या वर्गवारीमध्ये करण्यात आली असून फलोत्पादनाचा विषय कृषि इतर या वर्गवारीमध्ये समाविष्ट आहे. त्यानुसार वीज दर आकारणी करण्यात येते.
यासंदर्भात शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अधिवेशनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात विधानसभा सदस्य शेखर निकम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.



