रामटेकडी – वैद्यूवाडी पुलावरील बीआरटी मार्गात पहाटे ४.३० च्या सुमारास खाजगी ट्रँव्हल व पीएमपीएमएल बसला अपघात होऊन पीएमपीएमएल चालक गंभीर जखमी झाला आहे. सुनिल कोलते असे पीएमपीएमएल बस चालकाचे नाव असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या अपघातमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. गंभीर दुखापत झालेल्या चालकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास चालू आहे.