मेष : व्यवसायात काही कटू अनुभव येतील तरी दुर्लक्ष करा. नोकरीत पगारवाढ व बढती होईल. वृषभ : कामाची नवीन जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. मिथुन : मागण्यांसाठी वरिष्ठांपुढे हट्ट धरू नका. प्रकृतीला झेपेल तेवढेच काम करा. तरूणांनी अतिधाडस करू नये. कर्क : तसेच प्रकृतीकडेही लक्ष दयावे लागेल. तरूणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल सिंह : संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होतील. जोडधंदयातून जादा कमाई करता येईल. कन्या : नोकरीत कामाचा झपाटा वाखणण्याजोगा राहील. वेळेत बरीच कामे पूर्ण करू शकाल. तूळ : वरिष्ठांकडून कौतुकास पात्र व्हाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. डोके शांत ठेवावे. वृश्चिक : पैशाचे व्यवहारात चोख रहा. व्यवसायात हातातील कामे स्वतः पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. धनु : नोकरीत बदली किंवा परदेशगमनाचे सुतोवाच होईल. त्याचा भविष्यात फायदा घेण्याकडे कल राहील. मकर : नोकरीत वरिष्ठ नवीन प्रकारच्या कामाचे सूतोवाच तुमच्याजवळ करतील. त्याविषयी संदिग्धता असेल. कुंभ : व्यवसायात नवीन विचार व कार्यपद्धतीचा अवलंब करून उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. मीन : योग्य व्यक्तिंशी संपर्क साधा. गुरूची साथं तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. एखादा धाडसी निर्णय तुम्ही घ्याल.