मेष : ठरविलेले बेत साकार होतील. वृषभ : कामाचा उरक राहील, आवडत्या व्यक्तींची भेट. मिथुन : मानसिक समाधान मिळेल, कामे मार्गी लागतील. कर्क : विचार करून इतरांशी संवाद साधा. सिंह : कामाच्या नवीन संधी दृष्टीक्षेपात येतील. कन्या : मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तूळ : कामानिमित्त प्रवास घडेल. वृश्चिक : प्रकृतीची हेळसांड करू नका, लक्ष द्या. धनु : बुद्धीला खाद्य देणारे काम मिळेल, खुश राहाल. मकर : नोकरीत मनाविरूद्ध काम करावे लागेल. कुंभ : घरात सुखद प्रसंगाची नांदी होईल. मीन : फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल.