मेष : महिलांचा कामात वेळ जाईल. सामूहिक कामात पुढाकार राहील. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. वृषभ : नोकरीत अधिकार व सवलतीची सुविधा मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. मिथुन : रागांवर नियंत्रण ठेवलेत तर तुमचाच फायदा होईल. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल. प्रवास घडेल. कर्क : बेरोजगार व्यक्तिना कामधंदा मिळेल. स्वतःचे काम पूर्ण करून इतरांनाही कामात मदत कराल. सिंह : ‘एकमेकां सहाय्य करू’ असे धोरण राहील. नोकरीत लवचिक धोरण राहील. कन्या : विनय व शालीनता अंगी बाळगून सभोवतालच्या व्यक्तिना आपलेसे करून घ्याल. तूळ : नोकरीत प्रयत्नात सातत्य ठेवावे. तणाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहावे. वृश्चिक : नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामात बदल होण्याची शक्यता. जोडधंद्यातून विशेष लाभ. धनु : आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नवीन ओळखीतून लाभ. मकर : नोकरीत तुमची मते वरिष्ठांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. दगदग धावपळ कमी करा. कुंभ : कामांना प्राधान्य द्याल मगच कामांकडे वळाल. महिलांनी न चिडता खुबीने कामे करवून घ्यावीत. मीन : व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.