पिंपरी | वडगावात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
Updated On:

कान्हे, (वार्ताहर) – कृषी दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालय वडगाव मावळ येथे आयोजित कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन मावळ तालुका यांच्या मार्फत रब्बी हंगामातील ज्वारी उत्पादन क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र विजय आगळमे (रा. साते) यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कृषी अधिकारी डॉ. दत्तात्रेय पडवळ, संताजी जाधव, वडगाव भात संशोधन केंद्राचे प्रमुख नरेंद्र काशीद, शास्त्रज्ञ संतोष शहाणे आणि इतर विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक उपस्थित होते.





