Ganpati Visarjan 2025 | ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ह्या जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात आली. यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील मानाच्या पहिल्या दोन गणपतींनंतर आता मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. यंदाच्या वर्षी गुरुजी तालीम मंडळाकडुन बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या रथावर काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यासाठी आकर्षक फुलांच्या सजावटीत करण्यात आली आहे. झांज-लेझीम, पारंपरिक पोशाख, आणि शिस्तबद्ध मिरवणूक याचा अनुभव गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीत दरवर्षी पाहायला मिळतो. तीन तास आधी विसर्जन मिरवणूक संपवण्याचा निर्धार दरम्यान, यंदा तीन तास आधी विसर्जन मिरवणूक संपवण्याचा निर्धार मानाच्या पाच गणपती मंडळांनी केला आहे. मिरवणूक वेळे आधी संपवण्यासाठी चौकांतील ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादन आणि आवर्तन सादर करण्याच्या वेळा मंडळांनी कमी केल्या आहेत. याशिवाय कोणत्या चौकात किती वाजेपर्यंत पोहोचायचे याचे मायक्रो प्लॅनिंग केले असून त्याचे पालन करण्याचे आश्वासन पाचही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. हेही वाचा: मुंबईत गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाची जय्यत तयारी ; महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती