मुंबई : संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे.
अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मुंबईचा मानाचा गणपती ‘मुंबईचा राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
मुंबईच्या राजाच्या अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात मुंबईच्या राजाला निरोप देण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईच्या राजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. त्यासाठी गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी असणार आहेत.