महापालिकेकडून क्रीडापटूंचा सन्मान 

पिंपरी – महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच समाजसेवेमध्ये कार्यरत असलेल्यांचा सत्कार शुक्रवारी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेता सौरभ भावे, माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव, पर्यावरण प्रेमी महेंद्र शेवाळे, राहुल मोकाशी, संदीप भगत, वैभव रहाटे, किक-बॉकिंसगचे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खुशी रेवाळे, वैदही पवार, तनुजा बिचकुले, प्रविण वाघ, आदित्य कोईनकर, संजय मरगुडे, रोलबॉल स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू पार्थ वडेलकर, आंतरराष्ट्रीय योगसन सुवर्णपदक विजेत्या सलोनी जाधव, सोनाली दामले, गोसेवक रामकृष्ण लांडगे व किक-बॉकिंसगचे प्रशिक्षक संतोष म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.