दावडी -दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बजरंग दल संचलित हिंदूगर्जना प्रतिष्ठाण कनेरसर-पूर आयोजित शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून पायी शिवज्योत आणण्यात आली. तसेच खेड बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराज पुताळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना घेऊन शिवछत्रपती तसेच हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मारकास अभिवादन करून राजगुरूनगर ते कनेरसर दुचाकी रॅली काढण्यात आली.
तसेच विशेष म्हणजे गावातील माजी सैनिक दलात नानाभाऊ दौंडकर, सोमनाथ दौंडकर, संदीप दौंडकर, शंकर दौंडकर, महेंद्र दौंडकर, नवनाथ दौंडकर, अमोल ताम्हाणे, काळुराम दौंडकर, उपशिक्षण अधिकारी नितीन नेटके, कराटे ब्लॅक बेल्ट तथा सहा नॅशनल पदक विजेती-इंडिया रेकॉर्ड बुक होल्डर वैष्णवी भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. सुनील लाड यांचे व्याख्यान झाले.
यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अंबिका विद्यालयचे मुख्याध्यापक बी. टी. आंधळे यांच्यासह विद्यालयातील सर्व विद्यार्थीही सहभागी झाले होते. बजरंग दल हिंदूगर्जना प्रतिष्ठाण कनेरसर-पूर मधील शिवभक्तांनी उत्तम नियोजन पार पाडले. शिववंदना ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.