पॉवरफूल इंजिन अन् आकर्षक लूकसह होंडाच्या दोन नवीन बाइक्सची बाजारात एन्ट्री, किंमत-फीचर्स एकदा पाहाच

Honda New Bikes | होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली लोकप्रिय बाइक CB350RS चे नवीन 2025 मॉडेल बाजारात लाँच केले आहे. यासोबतच कंपनीने Hness CB350 चे देखील 2025 मॉडेल सादर केले आहे. कंपनीने या दोन्ही बाइक्सला नवीन रंग आणि पॉवरट्रेनसह सादर केले आहे. याशिवाय, यामध्ये अनेक नवीन फीचर्स देखील पाहायला मिळतात. होंडाच्या या दोन्ही नवीन बाइक्सची वैशिष्ट्ये, पॉवरट्रेन आणि किंमत जाणून घेऊया.
नवीन रंगात येतात बाइक्स
नवीन होंडा CB350RS बाइक DLX आणि DLX प्रो या दोन व्हेरिएंटमध्ये येते. DLX व्हेरिएंट पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे या 2 पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर DLX प्रो मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि रेबेल रेड मेटॅलिक रंगात येते. यासोबतच पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे हे रंग यापूर्वीपासूनच उपलब्ध आहेत.
बाइक्सच्या इंधन टाकी आणि साइड पॅनेलवर नवीन ग्राफिक्स (ट्विक्ड डिकल्स) देखील देण्यात आले आहेत. इंजिनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, बाइकमध्ये 348.36cc क्षमतेचे, एयर-कूल्ड इंजिन आहे, जे 21.78bhp ची कमाल पॉवर आणि 30Nm चा पीक टॉर्क निर्माण करते.
होंडाच्या नवीन CB350RS च्या DLX व्हेरिएंटची किंमत 2,15,500 रुपये आणि DLX प्रो व्हेरिएंटची किंमत 2,18,850 रुपये आहे.
नवीन Hness CB350 ची किंमत
नवीन होंडा Hness CB350 2025 बाइक DLX, DLX Pro आणि DLX Pro Chrome या 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या नवीन बाइकची एक्स-शोरूम किंमत 2.10 लाख ते 2.15 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. पॉवरट्रेनच्या बाबतीत, बाइकमध्ये 348.36cc क्षमतेचे, एयर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 20.78bhp ची कमाल पॉवर आणि 30Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.





