Meghana Kirtikar : मा. खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांचे निधन

मुंबईः शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तीकर यांचे आज पहाटे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्या ८२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आज ५ जानेवारी २०२५ रोजी त्यांची पहाटे साडेतीन वाजता उपचार घेत असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्याा माहितीनुसार, कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तीकर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. मेघना कीर्तीकर यांचे पार्थिव त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप पहाडी रोड नं २ या ठिकाणी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवधआम स्मशानभूमी पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगाव पूर्व या स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.





