“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी – अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक भरलेली गाडी सापडल्यानंतर आज पोलिस दलात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची केली आहे. तसंच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून लोक भयभीत झाले आहेत अस सांगत पोलिसांच्या बदल्यांची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

विधानसभेचे अधिवेशन हे शेतकरी प्रश्न, वीज बिल, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर गाजन अपेक्षित होत. परंतु हे गाजलं ते म्हणजे अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक भरलेल्या गाडीच्या मुद्द्यावरून. सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहेत. 

दरम्यान या प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझें यांच्यामागे राजकीय वरदहस्त आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी गृहखातं चालवणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा सत्यानाश आणि बट्ट्याबोळ झाल्याचं सांगत राज्यातील लोक हे भयभीत झाले आहेत. वाझे हे लादेन आहेत की लादेन चा बाप आहे हे आता त्यांना कळेल. वाझे यांच्या मागे मोठी राजकीय शक्ती आहे. 

हे आता स्पष्ट झाल असून गृहखातं चालवणाऱ्या अनिल देशमुख यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा दोन यंत्रणा करत असून आता बुरखे फाटायला वेळ लागणार नाही

दरम्यान, संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री करावं त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळात कुणीच बोलत नाही अशी टीकाही त्यांनी केलीय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.