‘होम फर्स्ट फायनान्स’चा IPO 21 जानेवारीपासून; एवढी आहे ‘शेअर’ची किंमत
Updated On:

मुंबई – होम फर्स्ट फायनान्स कंपनीची प्राथमिक समभाग विक्री म्हणजे आयपीओ 21 जानेवारी रोजी खुली होणार असून 25 जानेवारी पर्यंत हे विक्री चालेल.
या आयपीओमधील शेअरची किंमत 517 रुपये ते 518 रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 1,153 कोटी रुपये जमा करण्याचे ठरविले आहे.
काही कर्मचाऱ्यांना शेअर खरेदीसाठी प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. भांडवलाचा पाया विस्तारित करून भविष्यातील व्यवसाय वाढविण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
आयपीओ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शेअरची नोंदणी राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारावर करण्यात येणार आहे.





