मार ऑस्थाथिओस निमंत्रित हॉकी स्पर्धा : प्रियदर्शिनीचा किड्‌स इलेव्हनवर विजय

पुणे -प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटर संघाने किड्‌स इलेव्हन संघावर 8-0 असा सहज विजय मिळवत येथे होत असलेल्या मार ऑस्थाथिओस निमंत्रित हॉकी स्पर्धेत आगेकूच नोंदवली.

यावेळी प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटर, खडकीकडून कॅलविन म्याला (11 मि.) याने खाते उघडले. यानंतर साकेत शिंदेने (14, 17 मि.) दोन गोल केले. मध्यंतराला प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटर संघाने 3-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात प्रियदर्शिनी संघाकडून पाच गोल झाले. यात गॅव्हिन डिसूझा (39 मि.), रोनक येडलेल्लू (48 मि.), शांतनू हुले (53 मि.), सेब्बी अँथनी (55 मि.), मनोज पिल्ले (58 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.