HMD Barbie Phone | HMD ने भारतीय बाजारात एक नवीन फ्लिप फोन लाँच केला आहे. या फीचर फोनला कंपनीने Barbie Phone नावाने सादर केले आहे. HMD Barbie Phone आधीच जागतिक बाजारात लाँच झाला होता. आता या फोनची भारतात एन्ट्री झाली आहे. हा नवीन फीचर फोन बार्बीच्या आयकॉनिक गुलारी रंगात येतो. या हटके फोनचे डिझाइन बार्बी थीमवर आधारित आहे. फोनमध्ये 2.8-इंच डिस्प्ले, 64MB रॅम आणि 128MB स्टोरेज, ड्युअल सिम सपोर्टसह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. HMD Barbie Phone ची किंमत HMD Barbie Phone ला कंपनीने भारतात फक्त 7,999 रुपये आहे. फोनची बार्बी फ्रेंचाइजीच्या भागीदारींतर्गत निर्मिती करण्यात आल्याने याच्यामागे बार्बीचे ब्रँडिंग आहे. ग्राहक या फोनला HMD च्या भारतातील वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. हा फोन केवळ पॉवर पिंक या रंगात उपलब्ध आहे. HMD Barbie Phone चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स HMD Barbie Phone मध्ये दोन स्क्रीन दिल्या आहेत. आतल्या बाजूला 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे, तर बाहेरच्या बाजूला 1.77 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोन Unisoc T107 प्रोसेसरसह येतो. यात 64MB रॅम आणि 128MB स्टोरेज मिळते. तसेच, एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येईल. बार्बी फोनमध्ये ड्युअल सिमचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, नेटवर्क सपोर्ट GSM, WCDMA, LTE Cat1 आहे. फोनमध्ये VGA कॅमेरा देखील मिळतो. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. याशिवाय, MP3 प्लेयर आणि FM रेडिओची सुविधाही उपलब्ध आहे. फोनमध्ये Bluetooth 5.0 कनेक्टिव्हिटी दिली आहे. याशिवाय, USB Type-C सपोर्ट देखील मिळतो. HMD Barbie Phone मध्ये 1450mAh बॅटरी देण्यात आली आहे. या डिव्हाइसचे वजन फक्त 123.5 ग्रॅम आहे. कंपनी फोनसोबत दोन कव्हर्स देखील देत आहे, ज्यावर लोकप्रिय बार्बी डिझाइन्स आहे. हा फोन बार्बी थीमवर आधारित असल्याने त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी देखील पाहायला मिळतील. काही ठराविक शब्द टाइप केल्यानंतर बार्बीचा वॉलपेपर पाहायला मिळेल. हा हटके फोन बार्बीची आवड असणाऱ्यांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.