भाजपला धक्का! प्रविण दरेकरांची मागणी हायकोर्टाने फेटाळली
Updated On:

मुंबई – मुंबई बॅंक प्रकरणात भाजप नेते प्रविण दरेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या विरोधात दरेकरांनी मुंबई हायकोर्टात जी याचिका दाखल केली होती ती हायकोर्टाने फेटाळली आहे. आपल्यावरील गुन्हा रद्द करवा अशी त्यांची मागणी होती.
दरेकर यांनी आपण मजूर असल्याचे सांगून मजुरांच्या साठी राखीव असलेल्या जागेवर ते बॅंकेचे संचालक झाले होते. हे प्रकरण आम आदमी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने लाऊन धरले होते.
त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्यावर कारवाई होण्याच्या शक्यतेने दरेकरांनी हायकोर्टात धाव घेतली होती पण तेथे त्यांना दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणी थेट हायकोर्टात येण्या ऐवजी योग्य त्या न्यायालयात अर्ज दाखल करा अशी सुचना हायकोर्टाने दरेकरांना केली आहे.





