हिरेन हत्या प्रकरण | वाझेच मुख्य सूत्रधार

Updated On:

मुंबई – ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे, असा आरोप महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. वाझे हाच या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असावा, असा दावा एटीएसचे प्रमुख जयजितसिंग यांनी यावेळी केला.

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसचे महासंचालक जयजीतसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत माहिती दिली. सचिन वाझेंचा मनसुख हत्येमागील हेतू मात्र त्यांनी उलगडला नाही. ते म्हणाले, या प्रकरणात वाझेचा सहभाग सिध्द करण्याएवढे पुरावे उपलब्ध आहेत,

हिरेन यांना चार मार्चला रात्री आठ वाजून 20 मिनिटांनी घराबाहेर पडण्यासाठी फोन कॉल आला होता, असे यापुर्वी आढळले होते. त्याला धावत्या गाडीत मारहाण करून त्याला मुंब्रा खाडीत फेकून दिले असण्याचा संशय आहे.

या कटात वापरलेली सीमकार्ड एटीएसने जप्त केली आहेत. गुजरातमधील बुकी नरेश गौर याने ती कार्ड वाझे याच्या सुचनेनुसार दिली होती. तोही या कटात सहभागी असल्याचे आढळले आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आणखी एक निलंबित पोलीस अधिकारी विनायक शिंदे हाही या कटात सहभागी होता. वाझे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या शिंदे आणि गौर यांना एटीएसने 21 मार्चला अटक केली आहे.

आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने आखलेल्या या कटात वापरलेली व्होल्व्हो मोटार जप्त करण्यात आली. दमण येथून जप्त केलेली ही मोटार न्याय वैद्यक परीक्षणासाठी मुंबईत आणण्यात आली अहे. वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काही सीम कार्ड आणि सीसीटीव्ही फूटेज नष्ट केले आहे.

अनेक नावे समोर आली आहेत. अनेक संशयितांचे हात या प्रकरणात गुंतले आहेत, असे त्यांनी सांगितले. विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असून, लखनभैया बनावट चकमक प्रकरणात तो शिक्षा भोगत होता. त्याची नुकतीच तुरुंगातून पॅरोलवर सुटका झाली होती. आमच्याकडे या प्रकरणात बरीच नावे आहेत. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सचिन वाझे याने काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचे पुरावे हाती लागले आहेत, अशी माहितीही सिंग यांनी दिली.

वाझेची कोठडी आवश्‍यक

तपासादरम्यान वाझेने या प्रकरणात सहभाग असल्याचे नाकारले होते. आपल्या ताब्यात ही स्कॉर्पिओ कधीही नव्हती, असेही त्याने सांगितले होते. त्यामुळे त्याच्याकडे सखोल तपास करण्यासाठी त्याची कोठडी मिळणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. वाझे हा सध्या एनआयएच्या कोठडीत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी

2026-10-04 14:41:01

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी