पिंपरी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांचा रूट मार्च

हिंजवडी, (वार्ताहर) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाचे आयटी पार्क असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंजवडी पोषलसांनी तीन गावांमध्ये रूट मार्च काढून पोलीस बळाचे मोठे शषक्तप्रदर्शन केले.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सकाळी 10.30 ते 12.30 वाजेपर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला. सकाळी 10.30 वाजता हिंजवडीच्या मुख्य शिवाजी चौकातून सुरू केलेला रुट मार्च शिवतेज नगर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोरून हिंजवडी गावठाण तसेच साखरे वस्ती मार्गे परत शिवाजी चौक येथे बंद करण्यात आला.
त्यानंतर माण गावातही मानदेवी मंदिरापासून सुरू करून भोसले वस्ती मार्गे कुंभारवाडा मार्गे पुढे ग्रामपंचायत कार्यालय समोरून माण हिंजवडी मुख्य रस्त्यावर समाप्त करण्यात आला. रूट मार्च समारोप माणच्या भोईरवाडीमध्ये दुपारी 12.30 वाजता करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वीच हिंजवडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले हिंजवडीचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च शांततेत व सुरळीत पार पडला.
रूट मार्चमध्ये असा होता लवाजमा…
पोलीस दलाची ताकद दाखविण्यासाठी काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये – 2 पोलीस निरीक्षक, 7 सपोनि/पोउपनि, 25 अंमलदार तसेच वाकड पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी/9 अंमलदार, आरसीपी पिंपरी चिंचवड-1 अधिकारी 15 अंमलदार रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडील 2 अधिकारी 30 जवान.
दामिनी पथक हिंजवडी -4 महिला अंमलदार.त्याचप्रमाणे हिंजवडी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल, पेट्रो वन/टू/थ्री. मोबाइल 1, मोबाइल 2 वाहने सदर रूट मार्चमध्ये समाविष्ट केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिली.





