हिंगोली जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा; येलदरी धरणात 30% पाणीसाठा शिल्लक

हिंगोली (प्रतिनिधी) : राज्यात मराठवाडा, विदर्भ परिसरात गेल्या आठ दिवसा पासून जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पुण्यात पावसाने अनेक धरणे भरली आहेत. मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी हिंगोली जिल्ह्यात हवा तसा पाऊस अद्याप पर्यंत झालेला नाही त्यामुळे येलदरी धरण अजुन तहानलेलेच आहे सध्या धरणात केवळ 30% पाणी साठा ऊपलब्ध आहे
हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसा पासून रिमझिम पाऊस पडत मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्याला लागली आहे हिंगोली जिल्ह्यात आत्ता पर्यन्त 47 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या दिवसात येलदरी धरणात 57%पाणी साठा उपलब्ध होता. मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी हिंगोली जिल्ह्यात हवा तसा पाऊस अद्याप पर्यंत झालेला नाही. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. परिणामी हिंगोलीच्या येलदरी धरणात मात्र केवळ 30% पाणीसाठा जमा झाला आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला तर हे धरण भरल तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 17 मिमी पाऊस
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कळमनुरी तालुक्यात सर्वात जास्त 22.70 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 11.20 मि.मी. पाऊस पडला आहे.जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 14.90 (424.60), कळमनुरी 22.70 (375.60), वसमत 19.50 (347.30), औंढा नागनाथ 19 (349) आणि सेनगाव तालुक्यात 11.20 (361.90) मि.मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत सरासरी 373.80 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 47 अशी आहे.





