Hind Kesari Final 2026 Prithviraj Mohol threatened : साताऱ्यातील ५२ व्या ‘हिंद केसरी’ स्पर्धेचा अंतिम सामना वादळी ठरला. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढत अवघ्या १८ सेकंदांत संपली. कुस्तीदरम्यान पृथ्वीराजचा हात मोडल्याने त्याला माघार घ्यावी लागली आणि २-० गुणांनी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करत ‘हिंदकेसरी गदा’ देण्यात आली. मात्र, या दुखापतीनंतर आखाड्यात दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड वाद झाला आणि पृथ्वीराजने महेंद्रच्या वडिलांना थेट धमकी दिली. १८ सेकंद, खटकन आवाज अन् कुस्ती थांबली! (Hind Kesari Final 2026) कुस्तीचा अंतिम सामना सुरू होताच सर्वांच्या नजरा आखाड्याकडे लागल्या होत्या. पंचांनी शिट्टी वाजवताच सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या सेकंदापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. पृथ्वीराज मोहोळने बचावात्मक खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु महेंद्रने एक भक्कम डाव टाकत २ गुणांची कमाई केली. पुढील डावाच्या तयारीत असताना महेंद्रने पृथ्वीराजचा हात पकडून पिळला. दुर्दैवाने, हाताच्या अँगलचा अंदाज न आल्याने पृथ्वीराजचा हात थेट मोडला आणि आखाड्यात ‘खटकन’ असा आवाज आला. हा आवाज पंचांनी ऐकताच सामना तात्काळ थांबवण्यात आला. Maharashtra’s wrestler Mahendra Gaikwad won the prestigious ‘Hind Kesari’ title by defeating Prthviraj Mohol in the two-day 52nd Hindi Kesari wrestling championship, which was held at Chhatrapati Shahu Stadium in Satara, making it the first time the prestigious tournament was… pic.twitter.com/tFepb4tIc7 — United News of India (@uniindianews) May 18, 2026 हात जोडून माफी मागितली, पण वडिलांनी दिली धमकी! मैदानात तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. तपासणीत पृथ्वीराजचा हात सरळ होत नसल्याचे समोर आले. महेंद्रचा हा डाव पाहून पृथ्वीराजचे वडील प्रचंड संतापले आणि त्यांनी ‘रडीचा डाव न खेळता कुस्ती खेळ’ असा इशारा दिला. यावर महेंद्रने तात्काळ मैदानात हात जोडून आणि शपथ घेऊन “मी हे मुद्दाम केले नाही” असे सांगत माफी मागितली. मात्र, पराभव आणि दुखापतीमुळे संतापलेल्या पृथ्वीराज मोहोळची बॉडी गरम होती. त्याने थेट महेंद्र गायकवाडच्या वडिलांना आखाड्यातच ‘तुला संपवणार… लक्षात ठेव तू…’ अशी उघड धमकी दिली. हा सर्व प्रकार आणि ऑडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हेही वाचा – DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय! मिचेल स्टार्कच्या अचूक माऱ्यासमोर पराग-वैभवची वादळी खेळी व्यर्थ विजेत्याला ‘थार’ तर उपविजेत्याला मिळाला ‘ट्रॅक्टर’ या वादळी निकालानंतर महेंद्र गायकवाड याला ५२ वा ‘हिंद केसरी’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याला मानाची चांदीची गदा, रोख रक्कम आणि बक्षीस म्हणून ‘महिंद्रा थार’ (Mahindra Thar) गाडी देऊन गौरविण्यात आले. तर दुखापतीमुळे उपविजेता ठरलेल्या पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याला ‘ट्रॅक्टर’ देऊन सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक कुस्तीपेक्षा मैदानातील वादाचीच चर्चा आता महाराष्ट्रभर रंगत आहे.