Himanshi Narwhal : येत्या २४ अॅागस्ट २०२५ पासून बहुप्रतिक्षित हिंदी बिग बॅास या रियालिटी शोचा शुभारंभ होणार आहे. जसजसा शोच्या शुभारंभ जवळ येत आहे, तसतसे बिग बॅासच्या घरात स्पर्धकांबाबत माहिती समोर येत आहे. खरंतर बिग बॅास हिंदी या रियालिटीला शोला मोठं वलय असून, शोचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. शोचं होस्टिंग अर्थात अभिनेता सलमान खान करणार असल्यानं शोला विशेष महत्व प्राप्त होतं. या शोचा सीझन संपल्यानंतर आगामी सीझनचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच हा शो चाहत्यांच्या भेटीला येणार असून, या शोमध्ये एल्विश यादवची कॉलेज मैत्रीण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याची पत्नी हिमांशी नरवाल हिची एण्ट्री होणार असल्याची चर्चा होत आहे. ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे हिमांशी नरवाल हिला शोसाठी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. …म्हणून एण्ट्रीबाबत चर्चा टेलि चक्करने दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी हिमांशीला हा शो ऑफर केला आहे. सूत्रांनुसार, यावेळी निर्मात्यांना असे काही चेहरे हवे आहेत जे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतील. म्हणूनच हिमांशी नरवालची या शोमध्ये एण्ट्री बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापर्यंत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या शोमध्ये टीव्ही, बॉलिवूड कलाकारांसोबतच, युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या स्पर्धेक म्हणून येणार असल्याचं समजतं आहे. काही नवे बदल नुकताच बिग बॅासच्या नव्या पर्वाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या शोच्या ट्रेलरला चाहत्यांचा उत्स्फुर्ते प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बिग बॅासच्या घरात 15 बेड असतील आणि सर्व सिंगल असतील, म्हणजेच डबल बेडचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांना ठार करण्यात आल्याची वेदनादायी घटना एप्रिल महिन्यात घडली होती. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्देवी घटनेत एका नौदल अधिकाऱ्याला देखील ठार करण्यात आले. 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. नौदल अधिकारी विनय नरवाल यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांची पत्नी हिमांशी नरवाल ही विनय यांच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता बिग बॉसच्या नव्या पर्वात हिमांशी दिसणार की नाही यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हेही वाचा : ‘सूचना, सुनावणीशिवाय कोणाचेही नाव वगळले जाणार नाही’ ; ‘SIR’ वर निवडणूक आयोगाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र