पिंपरी | रावेतमध्ये हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिर

पिंपरी, (प्रतिनिधी) – श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनच्या वतीने मंगळवार, (दि. २८) मे ते मंगळवार, (दि. ४) जून सायंकाळी ५:३० ते ७:३० यावेळेत बेदात्मा आयुर्वेदिक हॉस्िपटल सिटी प्राइड स्कूल रोड रावेत याठिकणी हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.
कोणतीही क्रिया न करता अनुभूतीवर आधारित समग्र योगाची ८०० वर्षांची ध्यानपद्धती, सकारात्मक ऊर्जेचे आभामंडळ, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, प्रकृतीशी एकरुप होऊन अंतर्मुखी यात्रा करत दिव्य चैतन्याची अनुभूती. समर्पण ध्यान हा आपल्याला वैश्विक चैतन्याशी जोडणारा ध्यानाचा एक सहज सोपा आणि अद्वितीय मार्ग आहे.
तसेच विद्यार्थी आणि तरुणांसाठी विशेष महत्त्वाचे म्हणजे ध्यानाने एकाग्रता व आत्मविश्वास वाढू शकते. सुप्त सृजनशीलतेचा विकास होऊ शकतो. निःशुल्क असलेले हे ध्यानसंस्कार कार्यक्रम ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, अमेरिका, जपान, अशा जवळजवळ ७० देशाहून अधिक देशातील लोक या पद्धतीने ध्यान करत असून, तेथील लोकांचा समर्पण ध्यानयोग शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
समर्पण ध्यानयोग सरळ, सुलभ आहे, त्यात कोणत्याही प्रकाची योगासने, तसेच आहारसंबंधी कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. रोज नियमितपणे केवळ ३० मिनिटे ध्यान केल्यास शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात. अशी माहिती गुरुतत्व वैश्विक मंच द्वारा देण्यात आली.





