हिमाने व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली – भारतात करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने आता विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींना सहकार्याचे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील विविध खेळांतील 40 खेळाडूंशी यांच्याशी व्डिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
हिमा दास, सचिन, गंगुली, सिंधू यांच्यासह सर्व खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला जनतेसाठी जे काही करणे शक्य आहे ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही खेळाडूंनी पंतप्रधानांना दिली.
त्याच दरम्यान, हिमा दासने रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि जनजागृती करणारे पोलीस यांच्यावर दगडफेक करणे, त्यांच्यावर हल्ला करणे असे प्रकार झाल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त केली आणि नागरिकांची काळजी घेणारेच लक्ष्य होत असल्याबद्दल तिने पंतप्रधानांकडे आपली नाराजी व्यक्त केली.





